संकरित भेंडी तन्वी
Broadcast Year:
प्रसारण वर्ष:
Recommendation for cultivation: Suitable for hot and temperate climates of Maharashtra.
लागवडीकरिता शिफारस: महाराष्ट्र उष्ण व समशीतोष्ण हवामानासाठी उपयुक्त.
Land: Okra gives good yields in all types of soil, but the soil should be well drained and fertile.
जमीन: भेंडी हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले उत्पन्न देते. फक्त जमिनीचा निचरा व सुपीकता चांगली पाहिजे.
Sowing Time: Kharif - June-July, Summer - 15 Jan - 15 Feb
पेरणीची वेळ: खरीप - जुन-जुलै, उन्हाळी -१५ जाने -१५ फेब्रु
Sowing Method: dibbling/seed drill
पेरणीची पद्धत: टोकण पद्धत (ओळीत)
Sowing Distance: Row spacing: 45 to 60 cm Plant spacing: 15 to 20 cm
पेरणीचे अंतर: दोन ओळींतील अंतर: ४५ ते ६० सें.मी. (१.५ ते २ फूट) दोन रोपांतील अंतर: १५ ते २० सें.मी. (६ ते ८ इंच)
Number of trees Q.H.: 1.0 to 1.5 lakh trees per hectare
झाडांची संख्या प्र.हे.: १.० ते १.५ लाख झाडे प्रति हेक्टर
Sowing Depth: 2.5 to 3.0 cm.
पेरणीची खोली: २.५ ते ३.० से.मी.
Seed Quantity: Kharif -8 to 10 kg/ha, Summer -10 to 12 kg/ha
बियाण्याचे प्रमाण: खरीप -८ ते १० किलो / हेक्टरी, उन्हाळी -१० ते १२ किलो / हेक्टरी
Fertilizer dosage (nitrogen: phosphorus: potassium) : Okra should be given 50 kg nitrogen, 50 kg phosphorus and 20 kg potassium per hectare. Half of this nitrogen, complete phosphorus and potassium should be given at the time of planting and the remaining nitrogen should be given 30 days after planting.
खतमात्रा (नत्र: स्फुरद: पालाश): भेंडीस ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २० किलो पालाश प्रति हेक्टरी. त्यातील अर्धा नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीसोबत व उर्वरित नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
Duration (days): Fruits are ready for first picking after 45 to 50 days. Duration 100 to 120 days
कालावधी (दिवस): पहिली तोडणीसाठी फळे पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी काढणी योग्य. १०० ते १२० दिवस
Varietal Characters: First picking 45-48 days after fruit length 10-12 cm. Fruit color green Production 225-250 qt/ha Short internode distance.
वाणाचे गुणधर्म: पहिली तोडणी ४५ -४८ दिवसांनी, फळाची लांबी १०-१२ से.मी., रंग हिरवा, उत्पादन २२५ -२५० क्विं./हे, दोन फांद्यामध्ये कमी अंतर
Immune System: Tolerant to YVMV (Yellow Vein Mosaic Virus).
रोगप्रतिकारक क्षमता: YVMV (पिवळा शिरा मोझॅक विषाणू) ला सहनशील
Weight of 100 grains: 6.0 to 7.0 grams
१०० दाण्यांचे वजन: ६.० ते ७.० ग्रॅम
Average yield (sq. per ha.): 200 to 300 quintals per hectare
सरासरी उत्पादन (क्विं.प्रति हे.): २०० ते ३०० क्विंटल प्रति हेक्टर